श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र आणि गोवा

विशेष सुचना

घोषणा १

१२ मार्च २०२०

संदेश प्ले करण्यासाठी प्ले बटणावर क्लिक करा:


ओम श्री साईराम

संपूर्ण जगभरात वेगाने पसरणार्‍या कोरोना विषाणूमुळे आपण सगळेच भीतिदायक आणि कठीण काळातून जात आहोत हे आपलं दुर्दैवच आहे. भारत देश देखील याला अपवाद नाही. म्हणूनच भारत सरकारने या रोगाला साथीचा रोग घोषित करुन प्रत्येक नागरिकाला स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येकाने शक्यतो घरीच राहावं आणि प्रवास करणं टाळावं.

ही परिस्थिती लक्षात घेऊन मी , श्री सत्य साई सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येक भक्ताला या रोगापासून वाचण्यासाठी घ्यावयाची काळजी अथवा सावधगिरीची माहिती द्यावी. तशी काळजी सगळे घेत आहेत याची खात्री करून घ्यावी.

दुसरी गोष्ट, जरी आपण सारेच भगवान श्री सत्य साई बाबांच्या कृपेने सुरक्षित असलो तरी एकत्रितपणे सर्वांच्या रक्षणासाठी प्रार्थना करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या आपत्ती व्यवस्थापन गटाकडे (Disaster Management Team) मी विनंती करतो कि त्यांनी शक्य तेवढ्या लोकांना शक्य तेवढी मदत करावी.

लोकं नियंत्रणात राहतील याची खात्री करावी. प्रत्येक समिती संयोजकाला(Samithi Convenor) विनंती आहे की शक्यतो पुढील एक महिना कोणताही कार्यक्रम राबवू नये.

मी कोणताही कार्यक्रम पूर्णपणे रद्द करायला सांगत नाही परंतु शक्यतो सरकारने सांगितल्याप्रमाणे १५ एप्रिल २०२० पर्यंत कार्यक्रमांना स्थगिती द्यावी. चला एकत्र प्रार्थना करूया

जय साईराम.

घोषणा २

१२ मार्च २०२०

संदेश प्ले करण्यासाठी प्ले बटणावर क्लिक करा:


ओम श्री साईराम

भारत सरकारच्या आरोग्य खात्याने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती घोषित केल्यामुळे प्रशांती निलयम येथे होणारा चेटीचांद कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

तसेच, प्रगती प्रथम कार्यक्रम, जो सिक्कीम मधील गँगटोक येथे होणार होता तोदेखील पुढे ढकलण्यात येत आहे. आणि पर्ती यात्रा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तरी राज्यस्तरीय समिती किंवा गटांमध्ये होणारे भजन नेहमीप्रमाणे होऊ शकते जिथे मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येणे जरुरी नाही.

कृपया सूचनांचे पालन करावे.

साईराम

विशेष सुचना

ए.आय.पी द्वारे मंथ ऑफ गिविंग अँड फॉरगिविंग वरच्या सुचना

२० मार्च २०२०

संदेश प्ले करण्यासाठी प्ले बटणावर क्लिक करा:


ओम श्री साईराम

साई परिवारातील समस्त बंधु आणि भगीनींनो,

कोरोना वायरसने धारण केलेल्या महामारीच्या रुपामुळे सर्वांवर एका अत्यंत अनिश्चिततापुर्ण कठीण वेळ येऊन ठेपली आहे.

अशा परिस्थितीत आपल्या जवळ आपले स्वामी भगवान श्री सत्य साई बाबांनी वारंवार दिलेल्या "मी इथे असताना कसली चिंता" हया आश्वासनाचा दिलासा आहे. मला विश्वास आहे की हया संकटातून सुरक्षित बाहेर काढण्यास समर्थ असलेल्या भगवान बाबांना तीव्र प्रार्थना करण्याच्या बाबतीत तुम्ही व मी - आपण सारे एकाच पानावर आहोत.

या घडीला अविरत व्यक्तिगत व कौटुंबिक साधना अपरिहार्य आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी विविध मार्गाने ह्याची सुरुवात केली आहेच आणि आपल्याला ती पुढेही चालू ठेवलीच पाहिजे. भगवंताने आपल्याला दिलेल्या हया सुंदर संघटनेचा हिस्सा बनण्या मागील कारण सुद्धा हेच आहे.

योगायोग असा की दरवर्षी प्रमाणे आपण 24 मार्च ते 24 एप्रिल 2020 हया एक महिन्याच्या साधनेला लवकरच प्रारंभ करणार आहोत. महिना भर होणाऱ्या व हया साधनेचा कळस असलेल्या 'आराधना दिवस' पर्यन्तच्या कालावधीत आपला विश्वास अधिक दृढ़ व्हावा की आपल्या तसेच सर्व जीवांच्या हृदयात भगवान वास करतात आणि ही अनुभूति घेण्याचे प्रयत्न आपल्याला लवकरात लवकर करायचे आहेत.

सर्व प्रथम सर्वांना आपला विश्वास अधिक बळकट करावयाचा आहे की शाश्वत रक्षण कर्ते भगवान आहेत आणि त्यांना शरण जायचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे विभूति - आपल्या जीवनात विभूतिची भूमिका फार मोठी राहिली आहे आणि त्या अनुषंगाने स्वामी सतत आपल्या सोबत असतात. विभुतिला आपली रक्षणकर्ती ढाल बनवूया व सर्वांना वाटू या.

तिसरे म्हणजे व्यक्तिगत व कौटुंबिक साधना हया घटके ची निकड आहे ज्या द्वारे आपण स्वामींच्या दिशेने एक पाऊल टाकणार आहोत जेणेकरुन स्वामी आपल्या दिशेने शंभर पाऊले चालत येतील.

चौथी गोष्ट, संपूर्ण मानवजातीवर त्यांच्या कृपेचा वर्षाव होण्याचे प्रभावी साधन म्हणजे एकत्रित प्रार्थना. मी असे सुचवितो की हया रविवार पासून आराधना दिवसा पर्यन्त प्रत्येक रविवारी रात्री 9 ते 9.15 हया वेळेत 15 मिनिटे भारतातील प्रत्येक साई भक्त आपल्या घरी, आपल्या कुटुंबियां सोबत श्री सत्यसाई गायत्रीचा जप करेल. हया एकत्रित जपामुळे आपण आपल्या अंतस्थ दिव्य शक्तीशी अनुसंधान साधण्या व्यतिरिक्त हयाचा वातावरणावर सुद्धा फार मोठा परिणाम होऊ शकेल. जपाचा प्रारंभ तीन ओंकाराने व शेवट विश्व शांतीच्या प्रार्थनेने "समस्त लोकाः सुखिनो भवन्तु" ने होईल. हा जप केवळ आपल्या वैयक्तिक मोक्षप्राप्ति साठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातिच्या कल्याणासाठी एक महान सेवा ठरेल. भगवान बाबां वरील आपल्या दृढ़ श्रद्धे पोटी आपण त्यांचा उपदेश ध्यानी ठेवून राष्ट्रीय नियमांचे व सामाजिक शिस्तीचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे.

आत्म परिवर्तन मास (महिना) अंतर्गत विविध दैनिक साधनां कडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तशा सूचना तुमच्या पर्यन्त एका पुस्तिके च्या रुपाने राज्याध्यक्ष व उपाध्यक्षां मार्फत पोहचल्या आहेतच. श्री सत्यसाई संघटनेचे सर्व सामुदायिक कार्यक्रम पुढील आदेशा पर्यन्त बंद ठेवण्या संबंधी सूचना आपल्याला पु पूर्वीच दिलेल्या आहेत.

आता आपण हे करु या - स्वछतेच्या बाबतीत वारंवार हात धूणे, शिंक/सर्दी असल्यास मास्क वापरणे, एकमेकापासुन सुरक्षित अंतर राखणे, अत्यावश्यक नसेल तर घरीच थांबणे व आपल्या सग्या सोयऱ्याना वरील खबरदारी साठी जागरूक करणे. लक्षात ठेवा - वेळीच सावधानी घेतली तर होणारी हानि टळते. केवळ राष्ट्रीय उत्तरदायित्व म्हणून नव्हे तर एक जवाबदार नागरिक म्हणून वरील गोष्टी पाळायच्या आहेत. हे आव्हान भारत सरकारने देखील केले आहे म्हणून हयाचे निष्ठापूर्वक पालन केलेच पाहिजे.

माननीय पंतप्रधानांनी सुद्धा सर्व नागरिकांना मौलिक सूचना केल्या आहेत ज्यांचे पालन आपण संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेच पाहिजे.

प्रिय बंधु आणि भगीनींनो, आपले पाऊल पुढे सरसावुन अध्यात्मिक व सामाजिक पातळीवर आपले कर्तव्य निभावु या.

श्रद्धा व आत्मविश्वास कायम ठेवून स्वामींवरील आपली श्रद्धा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे.

सुरक्षित रहा, सुखी रहा.

सादर सप्रेम,
निमिष पण्ड्या
ए.आय.पी
श्री.स.सा.से.सं. भारत

विशेष सुचना

लॉकडाऊन दरम्यान सेवेविषयी ए.आय.पी चे संदेश

२६ मार्च २०२०

Click on the play button to play a message:

व्हाट्सअँप मेसेजेस बद्दल ए.आय.पी चे संदेश

२६ मार्च २०२०

Click on the play button to play a message: